आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार ; तोफखाना पोलिसांनी पीडित मुलीची केली सुटका

नगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तोफखाना पोलिसांनी पीडित मुलीची सुटका केली असून पळवून नेणार्‍या मुलाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अपहरण, पोक्सो कलमान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात वाढीव अत्याचाराचे कलम लावण्यात आले आहे. पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवला आहे. नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने लग्नाचे आमिष दाखवून त्याच उपनगरातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. पीडित मुलीच्या पालकांनी ११ जून रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अपहरण करणार्‍या मुलाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जे. सी. मुजावर, सहायक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे यांच्या पथकातील अंमलदार सुनील शिरसाठ, निलेश ससे, सचिन बाचकर यांनी पीडित अल्पवयीन मुलीचा शोध घेत तिची सुटका केली. पळवून नेणार्‍या मुलाला ताब्यात घेतले. पीडितेचा जबाब नोंदवून घेत पळवून नेणाऱ्या मुलाविरुध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...