आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Total Vegetables In The Country; 90 Percent Of Fruit Exports Come From Maharashtra; State Agriculture Commissioner Dheeraj Kumar's Information| Marathi News

शेतकऱ्यांशी साधला संवाद:देशातील एकूण भाजीपाला ; फळांच्या निर्यातीपैकी 90 टक्के निर्यात महाराष्ट्रातून; राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांची माहिती

नगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत कृषिप्रधान देश असून, देशातून निर्यात होणार्‍या भाजीपाला, फळांपैकी एकूण ९० टक्के निर्यात एकट्या महाराष्ट्रातून होते. शेतकर्‍यांचे यामध्ये मोठे योगदान आहे. शेतकर्‍यांना मानसन्मान मिळायलाच पाहिजे. तो शेतकर्‍यांचा हक्क आहे. शेतकर्‍यांमुळेच राज्याचा नावलौकिक झाला आहे. शेतकरी हाच खरा शास्त्रज्ञ आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त धिरजकुमार यांनी केले.कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत धिरजकुमार यांनी किन्ही (ता. पारनेर) गावातील शेतकऱ्यांशी गुरुवारी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, विभागीय कृषी सहसंचालक रफीक नाईकवाडी (पुणे), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले, जि. प. कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, सरपंच पूजा खोडदे, उपसरपंच हरेराम खोडदे, सीताराम देठे, पारनेरचे तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड यांच्यासह मंडळ कृषी अधिकारी, सर्व शासकीय यंत्रणातील अधिकारी, कर्मचारी, तसेच शेतकरी उपस्थित होते.

धिरजकुमार म्हणाले, मागील दोन वर्षे कोरोनात सर्व कारखानदारी बंद होती. परंतु शेती उद्योग अविरत चालू होता. कष्टकरी, शेतकरी शेतात राबून अन्नधान्य पुरवण्याचे काम करीत होता. या पुढील काळात गाव, समाज व शेती विकासासाठी सर्वांनी एकत्र राहायला हवे. स्मार्ट योजनेंतर्गत कृषी शेतकरी उत्पादक कंपनीसाठी एक मोठी योजना आहे. यात २०० ते २५० शेतकरी एकत्रित आले. कंपनी स्थापन होऊ शकते. त्यासाठी शासनाचे अनुदान आहे. या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री शेतकरी करू शकतो. यामुळे गावचा विकास होऊन देशाचा विकास होईल.

देशाचा विकास हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांवर अवलंबून असल्याचे ते म्हणाले, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले, ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत राबवला जाईल. याची सुरुवात नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील किन्ही गावापासून झाली. राज्यातील शेतकर्‍यांना येणार्‍या अडीअडचणी सोडवण्यासाठी हा उपक्रम कृषी मंत्री सत्तार यांच्या संकल्पनेतून राबवला जात आहे. ही योजना स्तुत्य आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी गाव पातळीवर जाऊन कॅम्प घेऊन गावातील अडीअडचणी व प्रश्न सोडवावेत, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. धिरजकुमार यांनी उद्यान पंडित शेतकरी राहुल रसाळ यांच्या शेताला क्षेत्र भेट देऊन चर्चा केली. शिवाजी जगताप यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...