आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय कृषी उत्पादनात अमुलाग्र क्रांती:नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून विषमुक्त अन्ननिर्मिती शक्य; कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांचे प्रतिपादन

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विषमुक्त अन्न निर्माण करणे शक्य होणार आहे. हरितक्रांतीमुळे भारतीय कृषी उत्पादनात अमुलाग्र क्रांती झाली आहे. सद्यस्थितीत शेती क्षेत्रासमोर सुरक्षित अन्न निर्मिती करण्याचे महत्वाचे लक्ष आहे, असे प्रतिपादन राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील १७ कृषी विज्ञान केंद्रांची मंगळवारी (३० ऑगस्ट) एक दिवसीय नैसर्गिक शेती ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील बोलत होते.

बातम्या आणखी आहेत...