आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोहरमनिमित्त कापड बाजार व घास गल्ली येथील व्यापारी व हॉकर्सनी एकाच व्यासपीठावर येऊन सरबतचे वाटप केले. काही महिन्यांपूर्वी शहराच्या बाजारपेठेतील व्यापारी व हॉकर्सचा वाद विकोपाला गेला असताना, दोन्ही एकत्र आल्याचा सुखद धक्का नगरकरांना बसला. व्यापारी व हॉकर्सचे वादावर अखेर पडदा पडल्याचे अधोरेखित झाले. हॉकर्स युनिटी असोसिएशनच्या वतीने मोहरमनिमित्त शरबत वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमस्थळी तिरंगे झेंडे लाऊन सामाजिक एकतेचे दर्शन सर्व धर्मिय व्यापारी व हॉकर्सनी घडवले. सरबत वाटप उपक्रमाची सुरुवात कोतवाली पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक संजय झिंजे, व्यपारी असोसिएशनचे अध्यक्ष ईश्वर बोरा, प्रदीप रासने, महावीर कांकरिया, प्रतीक बोगावत, हॉकर्स संघटचे अध्यक्ष साहेबान जहागीरदार, मुजाहिद कुरेशी, खालिद शेख, मोहसीन शेख, गफ्फार शेख, नदीम शेख, अशरफ शेख, राजू खाडे, नवेद शेख आदी उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.