आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात:औरंगाबादसह अन्य जिल्ह्यांतून अहमदनगरकडे येणारी वाहतूक 13 जूनपासून इतर मार्गावरून वळवली

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील औरंगाबादसह अन्य जिल्ह्यातील अहमदनगर शहरातून पुण्याकडे जाणारी वाहतूक सोमवार (13 जून) पासून पुढच्या 45 दिवसांसाठी शहरातील इतर मार्गावरून वळवण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

का वळवली वाहतूक?

अहमदनगर शहरात होत असलेल्या उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. अंतिम टप्प्याच्या कामात स्टेट बँक चौकात उड्डाणपुलाचे पिलर टाकण्याचे काम होणार आहे. त्यासाठी जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे. शिवाय या भागांत वाहतूक कोंडी देखील होणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस प्रशासनाबरोबरच आमची चर्चा झाली आहे. उड्डाणपुलाच्या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहतुकीत सोमवार (13 जून) बदल करण्यात येणार आहे. पुढच्या 45 दिवसांसाठी हा वाहतुकीत बदल होणार आहे.असे जगताप यांनी सांगितले.

आजपासून एकेरी वाहतूक

औरंगाबादसह अन्य जिल्ह्यातून व शहरातून येणारी वाहतूक सोमवारपासून स्टेट बँक चौकातून नवीन टिळक रोड मार्गे सक्कर चौकातून पुण्याकडे जाणार आहे. तर पुण्याहून येणारी वाहतूक सक्कर चौक मार्गे काठवण खंडोबा चौकातून नवीन टिळक रोड मार्गे जाणार आहे. ही वाहतूक एकेरी राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...