आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर:ड्डाणपुलाच्या कामामुळे खोळंबली वाहतूक

नगर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून औरंगाबाद व पुणे येथून येणारी वाहतूक शहरांतर्गत रस्त्याने वळवण्यात आली आहे. शहरातील अंतर्गत वाहतूक व बाहेरच्या जिल्ह्यातून येणारी वाहतूक एकत्र आल्यामुळे अहमदनगर शहराचा मुख्य वाहतुकीचा परिसर असलेल्या माळीवाडा वेस या भागात गुरुवारी दुपारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

नगर शहरातील नगर ते औरंगाबाद रोड असलेल्या स्टेट बँक चौक ते चांदणी चौका दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे औरंगाबादहुन पुण्याहून येणारी-जाणारी वाहतूक शहरांतर्गत रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. या दोन चौका दरम्यान एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. शहरातील मुख्य वर्दळीचा भाग असलेल्या माळीवाडा भागातून ही वाहतूक वळवण्यात आली आहे. अहमदनगर शहराची वाहतूक व अन्य जिल्ह्यातून आलेली वाहतूक एकत्र सुरू असल्यामुळे गुरुवारी माळीवाडा भागात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी दिसून आली. या वाहतूक कोंडीचा फटका पुणे व औरंगाबादहून येणाऱ्या प्रवाशांना बसला आहे.

उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यामुळे बाहेरून येणारी वाहतूक वळवल्याने माळीवाडा वेस भागात गुरुवारी वाहतूक कोंडी झाली होती. छाया : बंडू पवार.

बीएसएनएल ऑफिस चांदणी चौकात वाहतूक संथगतीने उड्डाणपुलाचे महत्त्वाचे काम बीएसएनएल कार्यालयासमोर सुरू आहे. मध्यभागी उड्डाणपुलासाठी मोठी जागा खोदून ठेवण्यात आली आहे. त्यावर सध्या काम सुरू असून तिथूनच पुढे असलेल्या स्टेट बँक चौकापासून चांदणी चौक व पुढे जाणारी वाहतूक गुरुवारी धिम्या गतीने सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...