आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅफीक जॅम:अहमदनगरच्या वाहतूक कोंडीत अडकले पुणेकर अन् छत्रपती संभाजीनगरचे प्रवासी

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील उड्डाणपूलासह उड्डाणपूलाखालूनही वाहनांच्या रांगा, रविवारच्या सुट्टीमुळे वाहनांची गर्दी वाढल्याने वाहतुकीचे नियोजन कोलमडले

सलग आलेल्या सुट्ट्यामुळे पुण्यावरून औरंगाबाद कडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्यामुळे रविवारी (7 मे )ला अहमदनगर शहरातील कायनेटिक चौक ते स्टेट बँक चौक वाहतूक ब्लॉक झाली होती. त्यामुळे पुण्याहून औरंगाबाद कडे व औरंगाबादहून पुण्याकडे प्रवाशांना अनेक तासापासून अहमदनगर मध्ये अडकून पडावे लागले. रात्री साडेसात नंतर देखील ही वाहतूक कोंडी कायम होती.

अहमदनगर शहरातील कायनेटिक चौकात दुपारपासूनच वाहतूक कोंडी सुरू झाली होती. शुक्रवार बुद्ध पौर्णिमा, शनिवार शासकीय सुट्टी व रविवार देखील शासकीय सुट्टी, यामुळे पुण्याहून औरंगाबाद कडे जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक रविवारी वाढल्यामुळे अहमदनगर शहरात वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे.

शहर वाहतूक शाखा पोलीस शाखेकडे कुठलेच नियोजन नसल्यामुळे पुण्याहून औरंगाबाद कडे व औरंगाबादहून पुण्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे सुट्टी संपून औरंगाबादहून पुण्याकडे जाणारे व पुण्याहून औरंगाबाद कडे जाणारे अनेक वाहने अहमदनगर शहरातील उड्डाणपूला वर व उड्डाणपुलाच्या खाली अडकून पडली आहेत.

अहमदनगर शहरातील उड्डाणपूलावरही वाहतूक कोंडीमुळे सायंकाळी वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या होत्या. तीच परिस्थिती उड्डाणपूला खालून असलेल्या रस्त्यावर देखील होती.

गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे नगर शहराबाहेरून जात असलेल्या बाह्यवळण रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे पुणे व औरंगाबादहून येणारे अनेक वाहने नगर शहरातूनच जात आहेत. रविवारी अचानक वाहनांची गर्दी वाढल्याने शहरातील वाहतुकीचा पुरता वजाबारा उडाला आहे.