आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 महिन्यांनंतर नगरमधील वाहतूक पूर्ववत:पुणे-औरंगाबादकडे जाणाऱ्या वाहनचालकांना दिलासा, सक्कर चौक अखेर खुला

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या महत्त्वाच्या टप्प्यातील कामामुळे शहराअंतर्गत तसेच पुणे व औरंगाबाद होऊन येणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली होती. 3 महिन्यापासून ही वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली होती. त्यामुळे शहरांतर्गत अनेक भागात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. बुधवारी (दि. 24) अखेर अन्य मार्गाने वळवण्यात आलेली वाहतूक पूर्वीच्या मार्गाने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबाद-पुण्याहून येणाऱ्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

विशेष म्हणजे शहरातील सक्कर चौकात वाहतुकीमुळे कोंडी होत होती. बुधवारपासून हा चौक तब्बल तीन महिन्यानंतर वाहतुकीसाठी खुला झाला आहे. अहमदनगर शहरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. उड्डाणपुलाच्या मुख्य कामासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अहमदनगर शहरासह औरंगाबाद-पुणे येथून येणारी वाहतूक शहरांतर्गत असलेल्या अन्य रस्त्याने वळविली होती.

माळीवाडा भागात होत होती वाहतूक कोंडी

पुण्याहून औरंगाबादकडे जाणारी वाहतूक सक्कर चौका मार्गे आयुर्वेद कॉलेज, माळीवाडा वेस या मार्गाने वळवली होती. तर औरंगाबादहून पुण्याकडे जाणारी वाहतूक स्वस्तिक चौक मार्गे आनंदऋषी हॉस्पिटल ते उदयनराजे हॉटेल समोर वळवण्यात आली होती. तीन महिन्यांपासून ही वाहतूक वळवण्यात आली होती. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी (सोमवारी) उड्डाणपुलाच्या कामामुळे शहरांतर्गत वाहतूक वळवण्यात आल्यामुळे माळीवाडा वेस भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

सक्कर चौक खुला

पुण्याहून औरंगाबाद कडे जाणाऱ्या वाहन चालकांसाठी सक्कर चौकातून जाणारा रस्ता बंद करण्यात आला होती. ही वाहतूक अन्यत्र मार्गाने वळवण्यात आली होती. अखेर बुधवार 24 ऑगस्ट पासून सक्कर चौकातून पूर्वीप्रमाणे वाहतूक सुरू झाली आहे. तब्बल तीन महिन्यानंतर सक्कर चौक पूर्वीप्रमाणे वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

पुणे-औरंगाबादकडे जाणाऱ्यांना दिलासा

अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाच्या कामासाठी सक्कर चौकातील वाहतूक आयुर्वेद कॉलेज मार्गे माळीवाडा वेस अशी वळवण्यात आली होती. माळीवाडा वेस भागात या वाहतुकीमुळे प्रचंड कोंडी होत होती. आता सक्कर चौकातून पूर्वीप्रमाणे सुरू झाल्याने पुण्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या व औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...