आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर रायझिंग फाऊंडेशनतर्फे रविवारी ( ५ फेब्रुवारी) पाथर्डी मार्गावर अहमदनगर क्लब मैदान ते चांदबीबी महालापर्यंत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यामुळे रविवारी पहाटे ५ ते सकाळी १० वाजेपर्यंत नगर क्लब मैदानापासून चांदबीबी महालापर्यंतच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी मुंबई पोलिस अधिनियमनुसार आदेश जारी केला आहे.
पाथर्डीहून नगरकडे येणारे सर्व प्रकारचे हलके वाहने सारोळा बद्दी, जामखेड मार्गे नगर अशी असेल. नगरहून पाथर्डीकडे जाणारी हलकी वाहने जामखेड, सारोळा बद्दी मार्गे पाथर्डी रोडकडे जातील. आयकर भवन येथून अहमदनगर क्लबकडे (भूईकोट किल्ला) जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. अहमदनगर क्लब मैदान-लकडी पूल-कॉन्व्हेंट चौक-किल्ला ग्राऊंड चौक- अहमदनगर छावणी कार्यालयासमोरील चौक-जॉगींग पार्क चौक- कॅन्टोन्मेंट सीओ निवासस्थानासमोरील चौक - नगर-पाथर्डी महामार्ग या मॅरेथॉन मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. नगर-पाथर्डी महामार्गावर भिंगार येथील पंचशील नगर वेशीसमोरील चौकापासून चांदबीबी महालापर्यंतच्या रोडवर फक्त दुचाकी, एसटी, रुग्णवाहिका व इतर हलक्या शासकीय वाहनांना प्रवेश करता येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.