आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक वळवली:सामुदायिक नमाज पठणासाठी नगरमध्ये वाहतूक वळवली

नगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरात रमजान ईदनिमित्त कोठला येथील ईदगाह मैदान आणि शेजारून जाणाऱ्या नगर-औरंगाबाद महामार्गावर सामुदायिक नमाज पठण होणार आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यासाठी वाहतूक वळवण्याचा आदेश जारी केला आहे.

असा केला वाहतुकीत बदल
औरंगाबाद आणि मनमाडकडून येणारी वाहतूक पोलिस अधीक्षक चौकातून भिंगारमार्गे चांदणी चौकाकडे तर पुणे, सोलापूरकडून येणारी वाहने चांदनी चौक, बेलेश्वर चौक, किल्ला चौक यामार्गे एसपी ऑफिस चौकाकडे वळवण्यात येतील. सर्व अवजड वाहने बायपास रोडने वळवण्यात आली आहेत. मंगळवारी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे.
.
रमजान ईदला कोठला येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांचे सकाळी सामुदायिक नमाज पठण होते. मैदानावरील जागा अपुरी पडत असल्याने शेजारून जाणाऱ्या महामार्गाचाही वापर केला जातो. त्यासाठी या महामार्गावरील वाहतूक तात्पुरती अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. कोठला येथील ईदगाह मैदान आणि महामार्गावर नमाज पठणास अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वाहतूक वळविण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...