आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण शिबिर:उद्या योग आणि ध्यान धारणाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण शिबिर ; पारंपरिक योगासह डान्स योगा

नगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक योग दिनानिमित्त मंगळवारी (२१ जून) नगर शहरात सर्व नगरकरांसाठी सावेडी जॉगिंग ट्रॅक, सावेडी येथे मोफत सामूहिक योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरी क्लब मिडटाऊनच्या अध्यक्ष प्रा. किरण कालरा यांनी दिली.

मंगळवारी सकाळी ६ ते ८.३० या वेळेत होणाऱ्या या योग शिबिरात पारंपरिक योग सोबतच डान्स योगा, हास्य योगा, प्राणायाम, ध्यान या योग प्रकारांचे प्रात्यक्षिकासह शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी रोटरीचे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, मुकेश छाजेड, राम मेघानी, नरेश नय्यर, विकी कुमावत, राकेश गांधी, चेतन भंडारी, पवन झंवर आदी उपस्थित राहणर आहे, अशी माहिती क्लबच्या सचिव कल्पना गांधी यांनी दिली.

या योग शिबिरात योग क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. योगिता सत्रे, पुष्कर शर्मा, योग विद्या धामचे रुपेश झंवर आणि जिजाऊ हास्य योगा ग्रुपच्या मनीषा गुगळे आदी अनुभवी तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच आहार आणि आरोग्य, आयुर्वेद आणि योग या विषयी डॉ. रणजित सत्रे, डॉ. प्रसाद उबाळे यांचे मार्गदर्शन होणार आहे, अशी माहिती रोटरी क्लबचे स्पोर्ट्स डायरेक्टर विनोद मोरे, अमोल खोले यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...