आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावकारी गुन्हा दाखल:मालमत्तेचा व्यवहार अवैध सावकारकीतून

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नालेगाव येथील मालमत्तेचा व्यवहार अवैध सावकारकीतून झाल्याचे उपनिबंधक सहकारी संस्थेच्या (नगर तालुका) चौकशीतून समोर आले आहे. याप्रकरणी येथील कोतवाली पोलिस ठाण्यात शिवशंकर शांतीलाल भंडारी (रा. दाळमंडई) याच्या विरूध्द महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिबंधक कार्यालयातील शेख अलताफ अब्दुल कादर (रा.आलमगीर, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे.

अभय रामलाल ललवाणी यांनी सावकारी व्यवहारात दिलेले गहाणखत रद्द होण्याबाबत तक्रार अर्ज दिला होता. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अर्जदार ललवाणी यांनी सादर केलेले म्हणणे व कागदपत्राची पडताळणी करून नगर तालुका उपनिबंधक कार्यालयाने २८ जुलै २०२१ रोजी निर्देश जारी करुन दोन पथकाची नियुक्ती केली होती. पथकाने २९ जुलै २०२१ रोजी शिवशंकर भंडारी याच्या राहत्या घरी व कार्यालयात झडती घेऊन प्राप्त कागदपत्र व पंचनामा सादर केला होता.

३० ऑगस्ट २०२१ रोजी व त्यानंतर वेळावेळी सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर पथकाने मालमत्तेची प्रत्यक्ष पाहणी केली. चौकशीत अवैध सावकारकीतुन व्यवहार केल्याचे समोर आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...