आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तासभर ठप्प:सब रजिस्ट्रार कार्यालयातील मालमत्तेचे खरेदी-विक्रीचे व्यवहार तासभर ठप्प

नगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरातील पराग बिल्डिंग जवळील मुद्रांक शुल्क विभागाच्या सब रजिस्ट्रार कार्यालयातील ऑनलाईनचे सर्व्हर मंगळवारी सकाळी डाऊन झाल्याने या कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामकाज ठप्प झाल्याने लाखो रुपयांचे मालमत्ते खरेदी-विक्रीचे व्यवहार तासाभरासाठी ठप्प झाले होते. दरम्यान दुपारनंतर हे सर्व पूर्ववत झाल्याने कामकाजाला सुरुवात झाली.

नगर शहरासह जिल्ह्यातील मुद्रांक विभागाच्या १४ कार्यालयातून नोंदणी केली जाते. दस्त नोंदणीपूर्वी ऑफलाइन पद्धतीने होती. गेल्या काही वर्षापासून दस्त नोंदणी ऑनलाईन झाल्यामुळे सर्व कामकाज ऑनलाइन चालते. नगर शहरातील पराग बिल्डींग जवळील मुद्रांक शुल्क विभागाच्या तीन सब रजिस्ट्रार कार्यालयातील ऑनलाइनचे सर्व्हर सकाळी साडेदहा ते साडेअकरा वाजेपर्यंत डाऊन झाले होते.

जिल्ह्यातील अन्य सब रजिस्टर कार्यालयातील सर्व्हर देखील याचवेळी डाऊन झाले होते. शहरातील तीन सब रजिस्ट्रार कार्यालयात प्रत्येकी दररोज २०० ते २५० दस्त नोंदणी होते. दिवसभरात ४०० दस्त नोंदणी होत असते. दस्त नोंदणीतून मुद्रांक शुल्क विभागाला वर्षाला कोट्यावधीचा महसूल मिळतो. ऑनलाइन झाल्यामुळे तासभर दस्तनोंदणीचे काम थांबले होते त्यामुळे मालमत्ता खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या नागरिकांना बाहेर ताटकळत उभे राहावे लागले. दरम्यान दुपारनंतर ऑनलाईनचे सर्व्हर पूर्ववत सुरू झाल्याने कामकाजाला सुरुवात झाली. अशी माहिती सब रजिस्ट्रार जाधव यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...