आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदभार स्वीकारला:निवासी उपजिल्हाधिकारी निचित यांची बदली

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांची मंत्रालयात बदली झाली. सोमवारी (२९ ऑगस्ट) निचित यांनी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.

संगमनेरचे उपविभागीय अधिकारी म्हणून निचित यांनी काम पाहिले होते. त्यानंतर नगर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर देखील काही काळ त्यांनी काम केले होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून झाली होती. कोरोनाच्या कालावधीत वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याशी समन्वय ठेवून काम केले होते. विशेषतः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता, औषधाची कमतरता भासत असताना या कालावधीत सर्व विभागाशी समन्वय ठेवून नियोजनबद्ध काम निचित यांनी केले होते. संगमनेरचे उपविभागीय अधिकारी असताना निचित यांनी ऑनलाइन विद्यार्थ्यांच्या दाखल्यासाठी अभिनव उपक्रम राबवला होता. गेल्या तीन वर्षापासून निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नगरमध्ये ते कार्यरत होते.

बातम्या आणखी आहेत...