आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या अधीक्षक राकेश ओला यांनी केल्या आहेत. ३३ निरीक्षक, १४ सहायक निरीक्षक व एक उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, अशा ४८ अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश बुधवारी (ता. १) सकाळी जारी करण्यात आले. दरम्यान, बदली झालेल्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक अधिकाऱ्यांनी बुधवारी दिवसभरात बदली ठिकाणी हजर होऊन पदभार घेतला. बदल्यांमध्ये नगर व परिसरातील कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प, नगर तालुका व एमआयडीसी पोलिस ठाण्यात नव्याने अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
शहरासह जिल्हाभरातील तणावाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यासमोर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आव्हान असणार आहे. बदली झालेले अधिकारी व कंसात पोलिस ठाणे पोलिस निरीक्षक - चंद्रशेखर यादव (कोतवाली), मधुकर साळवे (तोफखाना), ज्योती गडकरी (सुपा), संभाजी गायकवाड (पारनेर), ज्ञानेश्वर भोसले (श्रीगोंदा), विजय करे (कर्जत), महेश पाटील (जामखेड), संजय ठेंगे (बेलवंडी), संतोष मुटकुळे (पाथर्डी), शिवाजी डोईफोडे (नेवासा), हर्षवर्धन गवळी (श्रीरामपूर शहर येथे नियमीत केले), दशरथ चौधरी (श्रीरामपुर तालुका), मेघशाम डांगे (राहुरी येथे नियमीत केले), नंदकुमार दुधाळ (शिर्डी), गुलाबराव पाटील (शिर्डी वाहतूक शाखा), रामराव ढिकले (कोपरगाव शहर), वासुदेव देसले (कोपरगाव तालुका), भगवान मथुरे (संगमनेर शहर), देविदास ढुमणे (संगमनेर तालुका), संतोष खेडकर (घारगाव), सुभाष भोये (अकोले), संतोष भंडारे (आश्वी), मोरेश्वर पेंदाम (नगर शहर वाहतूक शाखा), चंद्रकांत निरावडे (जिल्हा वाहतूक शाखा), दिनेश आहेर (सायबर), मच्छिंद्र खाडे (मानवसंसाधन), सुहास चव्हाण (आर्थिक गुन्हे शाखा), अरूण आव्हाड (आर्थिक गुन्हे शाखा), घनश्याम बळप (वाचक), संपत शिंदे (जिल्हा विशेष शाखा), राजेंद्र भोसले (जिविशा, अतिरिक्त कारभार बीडीडीएस आणि द.वि.प), राजेंद्र इंगळे (साई मंदिर सुरक्षा तसेच अति. कारभार बीडीडीएस शिर्डी येथे नियमीत केले), नितीनकुमार गोकावे (टी.एम.सी.नगर). सहायक पोलिस निरीक्षक - राजेंद्र सानप (एमआयडीसी), शिशिरकुमार देशमुख (नगर तालुका), दिनकर मुंडे (भिंगार कॅम्प), युवराज आठरे (लोणी), महेश जानकर (खर्डा), कैलास वाघ (तोफखाना), समाधान पाटील (शिर्डी), गणेश इंगळे (राजूर), माणिक चौधरी (सोनई नियमीत केले), प्रकाश पाटील (अर्ज शाखा), ज्ञानेश्वर थोरात (नेवासा), गणेश वारूळे (एलसीबी), राजेंद्र पवार (संगमनेर शहर), राजू लोखंडे (राहुरी), उपनिरीक्षक अरूण भिसे (वाहतूक शाखा, शिर्डी).
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.