आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समुहाच्या माध्यमातून परिसराचा कायापालट घडवून आणला. बिपीन कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अभ्यासू नेतृत्व विवेक कोल्हे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या नावलौकीकात भर घालून यशस्वीपणे उपपदार्थाबरोबरच औषधी प्रकल्प उभारणीत मोलाचा सहभाग देत आहे. गीता मनुष्याला जीवनात चांगल्या वाईट गोष्टीची शिकवण देत असते, असे प्रतिपादन कोल्हे कारखान्याचे मुख्य लेखाधिकारी एस.एन. पवार यांनी केले.
येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या लेखा शाखेतील केन अकौंटंट हौशिराम पुंजाजी गोर्डे (रांजणगाव देशमुख)३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल मुख्य लेखाधिकारी पवार यांनी सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे आदी उपस्थित होते. हौशिराम गोर्डे यांचे सुपुत्र निलेश गोर्डे यांची फ्रान्स येथील कंपनीत निवड झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. प्रारंभी उपमुख्य लेखाधिकारी प्रविण टेमगर यांनी प्रास्तविक केले.
सत्कारास उत्तर देतांना केन अकौंटंट गोर्डे म्हणाले, संजीवनी उद्योग समुहात काम करतांना अनेक गोष्टींची शिकवणुक मिळाली ती सेवानिवृत्तीनंतरही उपयोगी पडणारी आहे. स्पर्धेत सहकारी साखर कारखानदारीने काय आत्मसात करावे याची शिकवण माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिली. परिस्थितीवर संघर्षाने मात केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.