आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओळख मिळाली:अहमदनगरमध्ये 65 तृतीयपंथीयांना मिळाले ओळखपत्र; आता मिळणार विविध शासकीय योजनांचा थेट लाभ

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्यावतीने अहमदनगर ज‍िल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या नोंदणीसाठी एकद‍िवसीय श‍िबीराचे आयोजन करण्यात आले होते. या श‍िबीरात अहमदनगर ज‍िल्ह्यातील ६५ तृतीयपंथीयांची ट्रान्सजेंडर नॅशनल पोर्टलवर नोंदणी करुन ज‍िल्हाध‍िकारी डॉ.राजेंद्र भोसले यांची स्वाक्षरी असलेले ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात आले. प्रथमच अशाप्रकारे प्रशासनाकडून अधिकृतरीत्या मिळालेल्या ओळखपत्र व प्रमाणपत्रामुळे तृतीयपंथीयांना थेट विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे.

अहमदनगर रेल्वे स्थानक रस्त्यावरील अहमदनगर महाविदयालयाच्या समोर असलेल्या 'समाजकार्य महाविदयालय व संशोधन संस्था' येथे एकदिवशीय विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ओळखपत्र व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाक‍िसन देवढे, तृतीयपंथीय जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे द‍िशा प‍िंकी शेख, काजलगुरु बाबु नायक नगरवाले, किरण रंगनाथ नेटके आदी उपस्थित होते. तृतीयपंथीयांसाठी शासनामार्फत विविध योजना राबव‍िणे, त्यांना प्राथमिक हक्क प्राप्त करून देण्यासाठी transgender.dosje.gov.in हे संकेतस्थळ केंद्र शासनाच्यावतीने व‍िकस‍ित केले आहे. या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या तृतीयपंथीयांना ज‍िल्हाध‍िकाऱ्यांच्या स्वाक्षरीने तृतीयपंथीय असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र द‍िले जाते. असे राधाकिसन देवडे यांनी सांगितले.

तृतीयपंथीयांना कुठूनही ऑनलाईन करता येणार अर्ज

अध‍िकृत ओळखपत्र धारक तृतीयपंथीयांना राज्य शासनाच्या वतीने व‍िव‍िध रोजगार व स्वयंरोजगाराच्या योजना राबव‍िल्या जातात. संकेतस्थळाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना ते कुठे असतील तेथून अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे.ट्रान्सजेन्डर धोरणानुसार एखाद्याची ओळख दर्शविण्यासाठी आणि पासपोर्ट, आधार, व इतर कागदपत्रांमध्ये बदल करण्यासाठी या प्रमाणपत्राचा उपयोग केला जावू शकतो. त्यामुळे सदर ओळखपत्र, प्रमाणपत्र तृतीयपथ‍ियांसाठी महत्वाचे आहे. सदर ओळखपत्र व प्रमाणपत्र तृतीयपंथीयांनी प्राप्त करुन घेतल्यानंतर शासनास त्याआधारे विविध योजना राबविणे शक्य होईल. असे देवडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...