आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमात जिल्ह्यातील 10567 बांधितांवर उपचार

दीपक कांबळे | नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात २०२२ मध्ये १ लाख २० हजार ५३८ चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी ४१९ जणांना या एकाच वर्षांत एचआयव्ही एडस् चा संसर्ग झाल्याचे निदान झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत तब्बल १० हजार ५६७ व्यक्ती एड्स सह जीवन जगत असून राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

एड्स नियंत्रणासह जनजागृतीत श्रीरामपूर विभागाचे कार्य सर्वोत्कृष्ट ठरले आहे. या उपक्रमांमुळे मागील तीन वर्षांत बाधीतांचा आकडा कमी होतानाचे दिलासादायक चित्र आहे.एड्स बाबत जागृती व समुपदेशन करण्यासाठी जिल्हाभरात २७ एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र (आयसीटीसी) केंद्र आहेत. एडस् नियंत्रण कार्यक्रमात श्रीरामपूर केंद्राचे कार्य उल्लेखनीय ठरले, असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या हस्ते केंद्रातील कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी दिली.राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रुग्णांच्या जोडीदाराचे समुपदेशन, एचआयव्ही तपासणी, लहान बालकांचे तपासणी, संदर्भ सेवा, उपचार केंद्रास जोडण्यासाठी पाठपुरावा, रुग्ण नियमित उपचार मिळावा यासाठी पाठपुरावा, क्षयरोग तपासणी करणे, जोडीदाराला संसर्ग होऊ नये यासाठी समुपदेशन, पाठपुरावा व साहित्याचा पुरवठा केला जातो.

जिल्ह्यात सद्यस्थितीत तब्बल १० हजार ५६७ जणांवर उपचार सुरू आहेत. २०२२-२०२२ या वर्षांत नव्याने ३१४ रूग्ण आढळून आले आहेत. एड्स नियंत्रणासाठी २७ आयसीटीसी केंद्रांनी केलेल्या कामाचे मुल्यांकन करण्यात आले. त्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या श्रीरामपूर केंद्रातीस प्रसन्न धुमाळ, लक्ष्मिकांत करपे, दुसऱ्या स्थानावर असलेल्या लोणी केंद्रातील बाळकृष्ण कांबळे, विजय वाघमारे, दिगंबर कावडवाले तर तिसऱ्या स्थानावरील राहुरी केंद्रातील अश्विनी शेळके, ज्ञानेश्वर इघे यांचा गौरव करण्यात आला.

उत्तम काम करणाऱ्यांमध्ये राहुल कडूस, सविता भामरे, वाळू इदे, शर्मिला कदम , सुचित्रा पवार, सुजाता दहिफळे, संदीप कांबळे, धनराज भरसट, अल्पना अल्हाट, नोयल सतराळकर , तृप्ती मापारी, दत्ता मस्के, पांडुरंग मुलगे, रवींद्र भोईटे, वैशाली ओहोळ, मोबीन शेख, दिनेश लोंढे यांचाही गौरव करण्यात आला.

बाधितांचा आकडा होतोय कमी
२०१० व २०११ या वर्षांत एचआयव्ही बाधित होण्याचा आकडा २ हजारांच्याही पुढे होता, एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबवलेल्या उपाय योजनांमुळे त्यात मागील पाच वर्षांत कमालीची घसरण दिसून आली आहे. २०२० नंतर दरवर्षी बाधित होण्याचे प्रमाण कमी होऊन पाचशेच्याही खाली आले आहे. २०२१ मध्ये ३९३ बाधित आढळले होते. तर २०२२ मध्ये हा आकडा ४१९ वर आहे.

बातम्या आणखी आहेत...