आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाझी वसुंधरा अभियान अंतर्गत अमृत सिटी गटात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल नगर महापालिकेचा मुंबई येथील सोहळ्यात सन्मान करण्यात आला. महापौर रोहिणी शेंडगे उपमहापौर गणेश भोसले आयुक्त शंकर गोरे यांच्यासह मनपा पदाधिकारी व अधिकाऱ्यांना या वेळी गौरवण्यात आले.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महापालिकेच्यावतीने महिला बाल कल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे, उपायुक्त यशवंत डांगे, मुख्य स्वच्छता निरिक्षक परीक्षित बिडकर, कुमार सारसर आदी सोहळ्यास उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नगर महानगरपालिका हद्दीतील वृक्षगणना उपक्रमास लवकरच सुरुवात केली जाणार असल्याचे महापौर शेंडगे यांनी सांगितले. वृक्षगणनेअंतर्गत झाडांची उंची, वय, झाडांचा घेर, झाडांचे ऐतिहासिकत्व (हेरिटेज ट्री), झाडांचे भौगोलिक स्थान, देशी विदेशी झाडांचे वर्गीकरण, नामशेष होत चाललेल्या झाडांचे पुनरुज्जीवन आदी उपक्रमातून पर्यावरणाबाबत जनजागृतीवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे महापौर शेंडगे यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.