आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत महोत्सव:श्रीगोंदे न्यायालय व शासकीय कार्यालयात वृक्ष दिंडी सोहळा

श्रीगोंदे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजादी की अमृत महोत्सवानिमित्त श्रीगोंदे न्यायालय, श्रीगोंदे पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपालिका यासह विविध विभागाच्या वतीने वृक्ष दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. श्रीगोंदे शहरातील विविध विद्यालय, महाविद्यालय, हायस्कूल मधील मूल मुले, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सकाळी झाडे लावा ,झाडे जगवा. अश्या घोषणा देत दिंडी ची प्रभात फेरी काढण्यात आली होती.

यात जिल्हा न्यायधीश मुजीब शेख, शुक्ल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या वेळी पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, न्यायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले, वन विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी एम. जी. कराहडे, सामजिक वन विभागाच्या अश्विनी दिघे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, गट शिक्षण अधिकारी अनिल शिंदे, अॅड. संदीप कावरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...