आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:सामनगाव सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी झाडे, उपाध्यक्षपदी काळे बिनविरोध; निवडीनंतर झाडे, काळे व नूतन संचालकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला

शेवगाव शहर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सामनगाव सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी सूर्यभान नारायण झाडे, तर उपाध्यक्षपदी शोभा बाबासाहेब काळे यांची बिनविरोध निवड झाली. सेवा संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध करण्यात आली होती. त्यानुसार नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी संजय दराडे यांनी संस्थेच्या नवनिर्वाचीत संचालकांची बैठक सोमवारी बोलवण्यात आली होती.

सामनगाव व लोळेगाव कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेची निवडणूक बिनविरोध केली. सर्व १३ जागांवरील बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांची अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी बैठक बोलावण्यात आली. या दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर दराडे यांनी दोघांच्याही निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले. झाडे यांचे नाव अशोक नजन सूचवले, तर त्यास बाजीराव कोकाटे यांनी अनुमोदन दिले.

काळे यांचे नाव भाऊसाहेब घुगरे यांनी सुचवले. गोकुळ पठाडे यांनी त्यास अनुमोदन दिले. यावेळी संदीप सातपुते, मुन्नाभाई शेख, आसाराम कळकुंबे, विठ्ठाबाई काळे आदी संचालक उपस्थित होते. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिव बाबासाहेब गवारे यांनी काम पाहिले. निवडीनंतर झाडे, काळे व नूतन संचालकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सुदाम झाडे, भानुदास काळे, शिवाजी कापरे, आदिनाथ कापरे, लालाभाई शेख, दिलदार शेख, देवदान कांबळे, दीपक कळकुंबे, रवींद्र सातपुते आदी उपस्थित होते. या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...