आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागाजर, भेंडी, कारले, पेरू, टोमॅटो, डाळिंब, नारळ, मिरची, लसूण, कांदा आदींसह विविध फळे, भाज्या, कडधान्य, डाळी, बिस्कीट, तांदूळ, मसाले उपयोगात आणून भारतीय तिरंगा साकारणारी रचना अकोले तालुक्यातील वीरगाव येथील धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश स्कूलच्या के. जी. च्या लहानग्यांनी केली. यानिमित्त या लहानग्यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याच्या उत्सवाची तयारी सुरु केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवहनानुसार देशभर अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याच्या उत्सवाची तयारी सुरु आहे. सोमवारपासून धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश स्कूलमधील चिमुरड्यांनी “ट्राय कलर फूड डे” साजरा करीत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरूवात केली. या उपक्रमासाठी वर्गशिक्षिका कविता दातीर, सुजाता भांगरे व तिकांडे मॅडम यांनी आजचा विशेष दिवस “ट्राय कलर फूड डे” म्हणून घोषित केला. त्यानुसार पालकांच्या पूर्वपरवानगीच्या सहयोगातून या बालगोपाळांनी फळे, भाजीपाला व खाद्य पदार्थांच्या माध्यमातून तिरंगा साकारला.
या बालगोपाळांच्या कलाकृतीचे प्रदर्शन विद्यालयातील वर्गात मांडण्यात आले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनीही तिरंगी पेहराव परिधान केला होता. या उपक्रमाचे धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, सचिव अनिल रहाणे, प्राचार्य किरण चौधरी, प्रा. संदीप थोरात, भीमराज मंडलिक, निलेश भागडे यांनी कौतुक करून अभिनंदन केले. स्वातंत्र्यदिनापर्यंत या शाळेत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याच्या उत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख भागडे, अलका आहेर, नफिसा शेख, पिंगळा सोनवणे, सुधीर उगले, शेटे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.