आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुराच्या पाण्यात वाहून गेले हाेते दाेघे जण:प्रशासनाकडून आदिवासी कुटुंबियांची दखल नाही ; पिचडांनी केले सांत्वन

अकोलेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आदिवासीबहुल भागांतून सांगवी, म्हाळुंगी, सोमठाण, तिरढे परिसरातून जोरदार पर्जन्यासह ढगफुटी झाली. त्यात दोन आदिवासी नागरिक पाण्यात वाहून गेले. या घटनेनंतर माजी मंत्री मधुकर पिचड (वय ८१) यांनी संबंधित कुटुंबाची गावात जाऊन भेट घेतली. पिचड घटनास्थळी पोहचेपर्यंत घटनेचा पोलिस पंचनामा करणे वगळता प्रशासनाकडून या कुटुंबीयांची कोणतीच दखल घेतली नव्हती. मात्र माजी मंत्री मधुकर पिचड यांच्याकडून कुटुंबियांचे सांत्वन करण्यात आल्यानंतर प्रशासनाला धारेवर धरत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधितांना संपर्क साधून मदतीसाठी पिचड यांनी धरला.

तालुक्यातील आदिवासी बहुल सांगवी येथील बाळू रामा साबळे (वय ५०) हे आपल्या घरातून बाहेर पडून गावातील दुकानातून तंबाखूपुडी विकत आणण्यासाठी गेले. याच वेळेस तेथे मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर त्याचा जोर अधिकच वाढला. तेथील ओढ्याला मोठा प्रवाह सुरू झाला. आणि त्याच प्रवाहातून बाळू साबळे पाण्यासोबत वाहून गेले. त्यांच्या कुटुंबातील घरात ७ माणसे होती. बाळू साबळे त्यांचे कुटुंबप्रमुख होते. सिन्नर तालुक्यातील सोमठाण येथील तरुण अशोक सुरेश डगळे (वय ३२) हा आपल्या दुचाकीवरून घरी परतत असतानाच रस्त्यातील ओढ्यावरील पाण्याचा प्रवाह वाढला व त्यांना त्याचा अंदाज न आल्याने ते दुचाकीसह वाहून गेले. एका शेतात विद्युत वितरण कंपनीकडून तारेचा ताण दिलेला होता, त्या ताणास तो मृतावस्थेत अडकून राहिला. त्याच्या घरात ५ माणसे असून तोही कुटुंब प्रमुख होता.

या सर्व नैसर्गिक आपत्तीत अकोले पोलिसांकडून घटनेनंतर पंचनामे करून पार्थिवांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. मात्र जिल्हा व तालुका प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नव्हती. तहसीलदारांनी या कुटुंबाना भेट देऊन चौकशीही केली नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मात्र दुर्घटनेनंतर माजी मंत्री पिचड यांनी तातडीने या कुटुंबियांबरोबर संपर्क साधून प्रत्यक्ष भेटून कुटुंबीयांचे सांत्वन केले. कुटुंबाला आर्थिक सहाय्य करून धीर दिला. दुर्घटनेतील दोन्ही व्यक्ती या कुटुंब प्रमुख असल्याने त्यांना सरकारी मदत मिळणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यादरम्यान मृत व्यक्तीचे आई वडील, पत्नी, मुले, भावंडे निशब्द झाल्याचे दिसून आले. माजी मंत्री पिचड यांनी महसूलमंत्री विखे व जिल्हाधिकांशी संपर्क साधून मदतीसाठी आग्रह धरला.

बातम्या आणखी आहेत...