आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Tribute Paid To Rahuri Rural Hospital Which Has Been Closed For Three Years; Youth Of Rahuri Performed A Unique Protest By Performing Gandhigiri.| Marathi News

दुर्लक्ष:तीन वर्षांपासून बंद राहुरी ग्रामीण रुग्णालयाला वाहिली श्रद्धांजली;राहुरीतील तरुणांनी गांधीगिरी करत केले अनोखे आंदाेलन

राजेंद्र वाडेकर | राहुरी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन वर्षांपासून बंद पडलेल्या राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त शहरातील तरुणांनी शुक्रवारी सकाळी भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करून गांधीगिरीच्या माध्यमातून आंदोलन छेडले. चोहोबाजूंनी पडझड झाल्याने राहुरी ग्रामीण रुग्णालयाची इमारत बंद पडली. या घटनेला शुक्रवारी, ९ सप्टेंबरला तीन वर्ष पूर्ण झाल्याने शहरातील तरुणांनी एकत्र येऊन राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा बाहेर तृतीय पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजलीचा लावलेला फलक रस्त्याने येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधणारा ठरला.

तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या राहुरी शहरातील ग्रामीण रुग्णाल्याची इमारत गेल्या ३ वर्षांपासून ढासळलेल्या अवस्थेत धूळखात पडून आहे. या इमारती भोवताली वेड्या बाभळी व गवताचा वेढा पडला. राहुरी ग्रामीण रुग्णालयाची सुसज्ज इमारत उभी करून नागरिकांना तत्पर आरोग्याची सुविधा मिळावी, ही मागणी गेल्या ३ वर्षांपासून केली जात आहे. यासाठी अनेकदा आंदोलने देखील छेडण्यात आले. मात्र राजकीय पुढाऱ्यांची उदासिनता नडल्याने नागरिकांच्या जीवन मरणाशी निगडीत असलेल्या या मागणीला आजअखेर वाटाण्याच्या अक्षदा मिळाल्या. शिर्डी व शिंगणापूर या जागतिक ख्याती असलेल्या धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या नगर-मनमाड राज्य महामार्गालगतचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून राहुरीची संपूर्ण देशभरात ओळख आहे.

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहना बरोबरच महाराष्ट्रासह परराज्यातील मालवाहू ट्रकचा सोयीचा मार्ग म्हणुन याच रस्त्याने येणेजाणे सुरू आहे. वर्दळीच्या मार्गामुळे या रस्त्यावर अपघाताच्या लहान-मोठ्या घटना कायमच घडत आहेत. अपघातातील जखमींवर वेळेवर उपचार होण्यासाठी सर्व सोयीसुवीधा युक्त शासकीय दवाखान्याची राहुरीला गरज आहे. मात्र राहुरीचे ग्रामीण रग्णालय गेल्या ३ वर्षापासून बंद अवस्थेत पडून असल्याने अपघातातील जखमी नागरकांना उपचारासाठी नगर अथवा इतर बाहेरच्या दवाखान्यात हलवण्याची वेळ येत आहे. या दरम्यान जखमी नागरिकांचा जीव गमावल्याच्या शेकडो घटना गेल्या तीन वर्षांत घडल्या आहेत.

राहुरीत ग्रामीण रूग्णालय इमारतीच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त फलकावर शोकाकूल म्हणून नगर-मनमाड राज्य महामार्गावर अपघातात मृत्यू पावलेले तसेच अपंगत्व आलेले नागरिक, बाळांतपणात आरोग्य सुविधा न मिळाल्याने मृत्यू पावलेल्या महिला तसाच आरोग्य सुविधांपासून उपेक्षित असलेले नागरिक यांचा ठळक मथळ्यात उल्लेख करण्यात आल्याने पडझड होऊन बंद पडलेल्या राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा तृतीय पुण्यस्मरणचा हा आगळावेगळा व लक्षवेधी कार्यक्रम राहुरी तालुक्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. याकडे आरोग्य प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

पर्यायी व्यवस्था देखावा
राहुरी ग्रामीण रुग्णालयाची पडझड झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून नगर परिषदेच्या पाठीमागील अभ्यासिका इमारतीच्या छोट्या खोल्यात रुग्णालय थाटण्यात आले. मात्र उपचारासाठी येणाऱ्या जखमी नागरिकांना कुठलीही सेवा मिळत नसल्याने शासनमान्य आरोग्याची सुविधा या गोंडस नावाखाली सुरू करण्यात आलेली दवाखान्याची ही पर्यायी व्यवस्था निव्वळ देखावा ठरली आहे.

बातम्या आणखी आहेत...