आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत महोत्सव:ध्वजसंहितेनुसार नसलेले तिरंगा ध्वज मागवले परत

नगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा झेंडा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक राष्ट्रध्वजांचा पुरवठा वेलस्पन इंडिया कंपनीमार्फत केला जात आहे. परंतु, यापैकी काही ध्वज हे ध्वजसंहितेनुसार नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ते वितरित करू नयेत, अशा सूचना नाशिक परिक्षेत्राचे विभागीय उपआयुक्त रमेश काळे यांनी दिले आहेत.

नाशिक परिक्षेत्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदूरबार व अहमदनगर जिल्ह्यांमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा मोहीम राबवली जात आहे. याअंतर्गत घरोघरी तिरंगा वितरण करण्यासाठी लागणारे ध्वज वेलस्पन इंडिया या कंपनीने पुरवले आहेत. यापैकी काही ध्वज ध्वजसंहितेनुसार असल्याचे समोर आले असल्याने ते वितरीत करु नयेत, असे उपायुक्त काळे यांनी म्हटले आहे.

गुणवत्तापूर्ण ध्वजांचाच पुरवठा करावा, तसेच ध्वजसंहितेनुसार नसलेले ध्वज परत मागवावेत, त्यांच्याऐवजी सुधारित गुणवत्तापूर्ण ध्वजांचा पुरवठा करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे उपायुक्त काळे यांनी पत्रामध्ये म्हटले आहे. हे पत्र पाच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिका आयुक्तांना पाठवण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद तसेच विविध शासकीय विभागांच्यातवीने या मोहिमेसाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...