आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगा ध्वज:नगर जिल्ह्यात 9 लाख 33 हजार घरांवर फडकणार तिरंगा ध्वज

नगर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्‍वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव राज्‍यभरात राबवण्यात येत आहे. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम जिल्ह्यात साजरा होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात ९ लाख ३३ हजार घरांवर तिरंगा ध्वज फडकणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी जिल्‍हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्‍त डॉ. पंकज जावळे उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच शासनाच्या विविध विभागातर्फे प्रशासकीय पातळीवर नियोजन केले आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवावा.

या मोहिमेसाठी विविध माध्यमातून राष्ट्रध्वज उपलब्ध होत आहेत. सुनिश्चित केलेल्या दराने सर्वांना महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, पोस्ट कार्यालय, स्वस्त धान्य दुकाने, बचत गट इत्यादी माध्यमातून राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध असतील. महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ७५ हजार घरांवर राष्ट्रीय ध्वज फडकणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...