आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगा:हर घर तिरंगा अभियानासाठी केडगाव टपाल कार्यालयात २५ रुपयांत मिळणार तिरंगा

नगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हर घर तिरंगा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केडगाव येथील टपाल कार्यालयात २५ रुपयात तिरंगा ध्वज उपलब्ध आहे, अशी माहिती पोस्ट मास्तर संतोष यादव यांनी दिली. स्वातंत्र्यदिनी प्रत्येकांनी आपल्या घरावर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा फडकवावा, असे आवाहन सरकारने केले आहे. या अभियानात कागदी झेंडे किंवा प्लास्टिकचे झेंडे देण्याऐवजी कापडी ध्वज देण्याची योजना सरकारने आखली आहे.

त्यामुळे या अभियानासाठी लागणारे तिरंगा ध्वज टपाल कार्यालयात उपलब्ध झाले आहे. या ध्वज विक्रीचा शुभारंभ शुक्रवारी केडगाव टपाल कार्यालयात करण्यात आला. याप्रसंगी पोस्ट मास्तर संतोष यादव, गहिनीनाथ पालवे महाराज, अनिल धनावत, वृषाली हिवाळे, बाबासाहेब बुट्टे, सुखदेव पालवे आदी उपस्थित होते.

या तिरंगा ध्वजाचा आकार तीन फूट बाय दोन फूट आहे.या तिरंगा ध्वजात कुठेही जोड लावलेला नाही. गावागावातील घरोघरी तिरंगा ध्वज पोहोचवण्याची जबाबदारी शासनाने टपाल खात्यावर सोपवली आहे. पहिल्या टप्प्यात केडगाव कार्यालयाला ५०० ध्वज प्रदान करण्यात आले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत दुसऱ्या टप्प्यासाठी मोठ्या प्रमाणात झेंडे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

ध्वज फडकवण्यासाठी प्रबोधन
ध्वज खरेदीसाठी केडगावातील लोकांना टपाल कार्यालयात जावे लागणार आहे, राष्ट्रध्वज सर्वसामान्यांना कमी खर्चात उपलब्ध करून दिला जात आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त घरोघरी झेंडा फडकवण्यासाठीही लोकांना प्रबोधन करण्यात येत आहे, अशी माहिती संतोष यादव यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...