आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कांगोणी फाट्यावर ट्रक उलटला; वाहतूक ठप्प

शनिशिंगणापूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगऱ-औरंगाबाद महामार्गावरील कांगोणी फाट्यावर नगरकडून औरंगाबादकडे जाणारा भंगाराचा ट्रक उलटला. यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल ४ तास ठप्प झाली होती. यामुळे वाहनधारक व प्रवाशांनी संताप व्यक्त केला. ही घटना रविवारी दुपारी साडे वाजेच्या सुमारास घडली.

नगर कडून औरंगाबादकडे जाणारा ट्रक (एमएच २१ बीएच १९१६) मागील बाजूने आलेल्या वाहनांना साईड देत असताना अंदाज न आल्याने दुभाजकावर चढून गेल्याने उलटला. यात ट्रक चालक जखमी झाला. शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होत. वाहतूक सुरळीत केली. या ठिकाणी दोन्ही बाजूंनी बस,ट्रक,खासगी वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...