आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभ्रष्ट सरकारी यंत्रणेला हाताशी धरून जमिनीच्या नकाशातच फेरफार करत मुकिंदपूर येथील नगर औरंगाबाद महामार्ग लगतची जमीन नावावर करून घेण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार नेवासे पोलिस स्टेशनला दाखल आहे. यात १२ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. नेवासे फाटा, मुकिंदपूर परिसरातील जमिनीचे भाव गगनाला पोहोचले आहेत. आजुबाजुची शेतजमीन जायकवाडी धरणासाठी अधिग्रहित झालेली आहे.
जमिनीचा दावा कोर्टात चालू आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर वसंत घुले (४९, रा. लोखंडे, नेवासे खुर्द, ता. नेवासे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, त्यांची मुकिंदपूर येथे गट नंबर ७३ मध्ये दुपारी चारच्या सुमारास ती जमीन सफाई करण्याचे काम सुरू केले होते. तिथे फिर्यादी घुले यांचे चुलतबंधू सत्यशील घुले व सचिन तलवार गेले होते. त्यांनी तेथे काम करणान्या मुजफ्फर शेख, प्रवीण साळवे इतर चार पाच जणांना हटकल व जमिनीत काय करताअसा जाब विचारला.असता त्यांना धक्काबुकी शिवीगाळ केली. यावेळी घुले यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.