आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदरांजली अर्पण:तुकाराम गडाख यांचे हृदयविकाराने निधन

सोनई, नेवासा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर दक्षिणचे माजी खासदार तुकाराम गंगाधर गडाख (वय ६९) यांचे हृदयविकाराने निधन झाले. नेवासा तालुक्यासह जिल्ह्यात त्यांनी राजकीय, आरोग्य, शैक्षणिक व आध्यात्मिक कार्यात मोठे योगदान होते. शोकाकूल वातावरणात पानसवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.तुकाराम गडाख यांचा जन्म पानसवाडी येथे झाला.

त्यांचे शिक्षण बीएससी ऍग्री होते. १९८९ ते १९९४ मध्ये ते नेवासा शेवगावचे अपक्ष आमदार तर २००४ ते २००९ मध्ये अहमदनगर दक्षिणचे राष्ट्रवादी पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले होते. नंतरच्या काळात त्यांनी वारकरी संप्रदाय मधून कीर्तन, प्रवचन या माध्यमातून अध्यात्मिक सेवा केली. आदर्श विद्या मंदिर या शैक्षणिक संस्थेची स्थापना करून सोनई, नेवासा, शेवगाव येथे शैक्षणिक संकुल उभे केले. पानसवाडीचे सरपंच लक्ष्मीबाई गडाख यांचे ते पती, आदर्श विद्यालयाचे सचिव रवीराज गडाख यांचे वडील व पुणे येथील उद्योजक किसनराव गडाख यांचे ते भाऊ होते.

त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगा, २ मुली, एक भाऊ, ५ बहिणी, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दुपारी २ वाजता मुलगा रवीराज यांनी त्यांना अग्नी दिला. यावेळी माजी मंत्री शंकरराव गडाख, खासदार सदाशिव लोखंडे, शिवाजी कर्डिले, पांडुरंग अभंग, विठ्ठल लंघे, भाऊसाहेब वाकचौरे, युवा नेते उदयन गडाख, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी आदरांजली अर्पण केली.

बातम्या आणखी आहेत...