आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदत:मिरवणूक खर्चाला फाटा देऊन तुळजाभवानी ग्रुपची आजारी तरुणाला मदत

कुकाणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भेंडे येथील जय तुळजा भवानी ग्रुपने मिरवणूक खर्चाला फाटा देऊन आजारी तरुणाला २१ हजार रुपयांची मदत केली. जय तुळजा भवानी ग्रुपचे शारदीय नवरात्र उत्सवाचे हे ५ वे वर्ष आहे.या ग्रुपच्या वतीने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन,भारुड, रक्तदान शिबीर, व्याख्यान, आर्थिक मदत असे विविध उपक्रम राबवले जातात.

दसऱ्याच्या दिवशी बहिरोबा मंदिरात आयोजित नवरात्र सांगता व देवी विसर्जन मिरवणूक कार्यक्रमात देवीमूर्ती विसर्जन मिरवणुकीतील डीजे व मिरवणुकीवर होणारा खर्च टाळून आजारी असलेल्या नीलेश नामदेव महापूर या तरुणाला औषधोपचारासाठी २१ हजार रुपयांची रोख मदत जोशी समाज संघटनेचे अध्यक्ष वामन मापरे, सुखदेव फुलारी, शरद गव्हाणे, गणेश महाराज चौधरी यांचे उपस्थितीत सुपूर्द केली.

बातम्या आणखी आहेत...