आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडिसेंबर महिना संपत आला तरी अद्याप जलसंपदा विभागाने शेतीचे आवर्तन सुरू केलेले नाही. जलसंपदा विभागाने सात नंबर अर्जाची वाट न बघता शेतीचे आवर्तन सुरू करावे अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. कार्यकारी अभियंता नान्नोर यांच्याकडे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, युवराज जगताप, रमूकाका औताडे यांनी निवेदन दिले आहे.
पाटबंधारे विभागाकडे भंडारदरा आणि निळवंडे दोन्ही धरणांची एकूण जवळपास १८ टीएमसी पाणी शिल्लक आहे. पुढील पाच ते सहा महिन्याच्या कालावधीमध्ये शेती व पिण्यासाठी धरण कार्यक्षेत्रामध्ये सहा ते सात रोटेशन होऊ शकतात.
सन २०१६ पासून जलसंपदा विभागाने पाणीपट्टी आकारणीत दुपटीने वाढ केल्यामुळे शेतकरी अर्ज भरण्यास इच्छुक नाहीत. वाढलेल्या पाणीपट्ट्यामुळे पाणी घेणे शेतीला परवडत नाही. उसासारख्या शाश्वत पिकाला खरीप, रब्बी व उन्हाळी आवर्तनात सरासरी हेक्टरी ५ हजार रुपये पाणीपट्टी आकारली जाते. हेक्टरी १५ ते २० हजार रुपये सिंचनाचा खर्च येतो. पाणी अर्ज भरूनही अप्रत्यक्ष वारंवार शेतकऱ्यांना सर्रास पैशाची मागणी होत असते. त्यामुळे शेतकरी पाणी अर्ज भरून पाणी घेण्यास तयार नाही, असा आरोप केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.