आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:लग्नाचा देखावा करून सव्वादोन लाखांना गंडा; चौघांना जेलची हवा

पारनेर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाचा बहाणा करून काही दिवसानंतर वधू पसार करणारी टोळी वाडेगव्हाण येथील पीडीत मुलाच्या वडिलांसह त्यांच्या नातेवाईकांनी उघड केली. असे उद्योग करणाऱ्या बनावट वधूसह लग्नाचा देखावा करणाऱ्या दलालांना सुपे पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. संदीप डाखोरे (खडकी, ता.बार्शीटाकळी, जि. अकोले ), प्रशांत गवई ( बुलढाणा), अर्चना पवार (मुकुंदवाडी), औरंगाबाद), संगिता पाटील अशी आरोपींची नावे आहेत. पीडित मुलाच्या वडिलांकडून लुबाडलेले पैसे हस्तगत करण्यात आल्याची माहिती निरिक्षक डॉ. नितिनकुमार गोकावे यांनी दिली.

वाडेगव्हाण येथील पोपट तानवडे हे मुलाच्या लग्नासाठी मुलीचा शोध घेत असताना विवाह जमवणारा दलाल संदीप प्रल्हाद डाखोरे यांच्याशी त्यांची भेट झाली. त्याने तानवडे यांना दोन मुली दाखवल्या.त्यापैकी औरंगाबादमधील मुकुंदवाडी येथील कोमल नावाची मुलगी त्यांना पसंत पडली. मुलीस आई वडील नाहीत. मावशीकडे ती राहते. लग्न करायचे असेल तर मावशीला अडीच लाख रुपये द्यावे लागतील, असे त्याने सांगितले. त्यावर दोन लाख वीस हजार देण्याचे तानवडे यांनी कबुल केल्यानंतर २० मे रोजी कोमलचा विवाह तानवडे यांच्या मुलाशी झाला. ७ जून रोजी प्रशांत गवई तानवडे यांच्या घरी आला. तुमच्या मुलाशी ज्या कोमल हिचा विवाह झाला आहे ती माझी पत्नी आहे. तिचे नाव कोमल नसून अर्चना रामदास पवार असे आहे, असे तो सांगू लागला. त्यांच्यात वाद होऊन अर्चना व प्रशांत वाडेगव्हाण येथून निसटण्याच्या तयारीत असताना दोघांनाही तानवडे तसेच त्यांच्या नातेवाईकांनी पकडून सुपे पोलिसांच्या हवाली केले.

बातम्या आणखी आहेत...