आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Twelve Villages In The Taluka Will Be Given Water For Agriculture By Breaking The Gate, Said Former Zilla Parishad Member Dr. A Warning Given By Pratibha Babanrao Pachpute | Marathi News

इशारा:गेट तोडून तालुक्यातील बारा गावांना शेतीसाठी पाणी देणार, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रतिभा बबनराव पाचपुते यांनी दिला इशारा

श्रीगोंदे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कुकडीच्या लाभ क्षेत्रातील बारा गावातील शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न गंभीर झाला आहे. नियमानुसार १३२ चारीला कुकडीचे पाणी मिळण्यासाठी ५ एप्रिलला सर्व शेतकरी महिला भगिनींना बरोबर घेऊन गेट तोडो आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रतिभा बबनराव पाचपुते यांनी दिला आहे.

प्रतिभा पाचपुते म्हणाल्या, आठरा दिवस झाले, कर्जत व करमाळा तालुक्यात सत्ताधारी आमदारांची मर्जी सांभाळण्यासाठी कुकडीचे आवर्तन चालू आहे. तेथे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत म्हणून जास्त दिवस पाणी आणि श्रीगोंद्यात विरोधी आमदार आहेत म्हणून वेळेवर पाणी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांची टाळाटाळ का? राज्यात महाविकास आघाडीचे सहकार आहे, त्यामुळे अधिकारी सत्ताधाऱ्यांचे बाहुले झालेत का? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही महिला गप्प बसणार नाही. जर अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कुकडीचे आवर्तन तालुक्यातील लिंपणगाव, वेळू, चोराचीवाडी, म्हातारपिंप्री, शिरसगाव बोडखा, लोणी व्यंकनाथ, पारगाव, श्रीगोंदा, बाबुर्डी, बेलवंडी, घारगाव या बारा गावांना पूर्ण दाबाने पाणी सोडून येथील प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी वेळप्रसंगी जेलमध्ये जाण्याची वेळ आली तरी चालेल, आता आम्ही गप्प बसणार नाही. वेळेत पाणी सोडले नाही, तर १३२ चारीचे गेट तोडून पाणी तालुक्यातील बारा गावांना देणार असा इशारा डॉ. प्रतिभा बबनराव पाचपुते यांनी दिला आहे.

डॉ. पाचपुते यांच्या इशाऱ्यानंतर पाटबंधारे विभाग काय कार्यवाही करते, याकडे आता तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले.

बातम्या आणखी आहेत...