आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकारी यंत्रणेला हाताशी धरून जमिनीच्या नकाशातच फेरफार करत मुकिंदपूर येथील नगर औरंगाबाद महामार्ग लगतची घुले कुटुंबियांची जमीन नावावर करून घेण्याचा प्रयत्न झाल्यामुळे नेवासा तालुक्यात उघडकीस आलर. मोठ्या रॅकेट प्रकरणी नेवासा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केले. अद्यापही या प्रकरणातील सात आरोपीं फरार आहेत अटक झालेल्या प्रवीण साळवे व मुजफ्फर राजू शेख यांना १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
कागदपत्रांमध्ये फेरफार करून जमिनी बाळ कोणाचे मोठे रॅकेट चालू होते या प्रकरणामुळे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने मोठी या गुन्ह्यामध्ये असलेल्या आरोपींव्यतिरिक्त शासकीय कार्यालयातील अनेक नोकरदार यात सामील असल्याचे हळूहळू स्पष्ट होत आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी म्हणून प्रवीण साळवे, मुजफ्फर राजू शेख यांना अटक झाली. तुकाराम गणपत काळे, शिवाजी लक्ष्मण पाठक, संतोष शेषमल फिरोदिया ,अमित संतोष फिरोदिया , राजू जहागीरदार यांचे सह इतर आरोपी अद्याप फरार आहेत.
मुकिंदपुर परिसरातील जमिनीचे भाव गगनाला पोहोचले आहेत घुले यांच्या आजोबाची शेतजमीन जायकवाडी धरणासाठी अधिग्रहित झालेली आहे. त्या कुटुंबाला धरणग्रस्तांच्या पुनर्वसन योजनेत मिळालेली ही जमीन असून, त्या जमिनीत दोन जणांचा हिस्सा आहे. व या ४१ गुंठे जमीन आहे जमिनीचा दावा कोर्टात चालू असतानाही मुजफ्फर शेख, प्रवीण साळवे व इतर आरोपींनी या जमिनीत साफसफाई करून प्रयत्न केला होता. जाब विचारला असता फिर्यादी घुले यांना धक्काबुकी शिवीगाळ केली.
भूमिअभिलेख कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी व कर्मचान्यांनी मूळ नकाशात फेरबदल करून नवीन बनावट नकाशा तयार केला आहे. त्या नकाशाच्या आधारे जमीन हडपणाऱ्यांना साथ करण्यासाठी नगर येथील नगररचना कार्यालयातील काही अधिकान्यांनी वादग्रस्त गट क्रमांक ७३ मधील पुनर्वसन १९८८ची तहसील बिगरशेती या जागेत चुकीचे रेखांकन करून घेतले असल्याचा दावा फिर्यादीने केला होता. तसेच नगर प्रांत कार्यालयात मयत व्यक्तीच्या नावे संमतीपत्र तयार झाल्याने शासकीय विभाग संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.