आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:महिलेची अडीच लाखांची फसवणूक

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास ते डबल करून देण्याचे आमिष दाखवून नोकरदार महिलेची दोन लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सावेडी उपनगरातील महिलेने या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुरज राजू मोढवे (रा. वाकोडी ता. नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सावेडी उपनगरातील फिर्यादी महिला नागापूर एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीला असताना त्याच कंपनीत नोकरीला असणार्‍या सुरज मोढवे बरोबर त्यांची ओळख झाली होती.

त्याने फिर्यादीचा विश्‍वास संपादन करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखविले होते. फिर्यादीने त्यांच्या झोपटी कॅन्टींग येथील टीजीएसबी बँक खात्यातून फोन पे यूपीआयद्वारे मोढवे याच्या नंबरवर ५२ हजार ३८५ रूपये पाठविले. तसेच फिर्यादीने मोढवेला रोख दोन लाख रूपये दिले होते. असे दोन लाख ५२ हजार ३८५ रूपये फिर्यादीने मोढवे याला दिले होते. मोढवे याने फिर्यादी यांच्या नावे शेअर मार्केटमध्ये कुठलीही गुंतवणूक न करता त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...