आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकाच क्रमांकाची नंबर प्लेट दोन मालवाहू ट्रकांना वापरून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी श्रीरामपूर येथील मोटार वाहन निरीक्षकांनी नेवासा पोलीस ठाण्यात मालवाहू ट्रकच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूरचे मोटार वाहन निरीक्षक सुनील गोसावी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
गोसावी यांची वायुवेग पथक प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे. १६ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी दोन वाजताचे सुमारास नेवासे तालुक्यातील सुरेगाव फाटा येथे वाहन क्रमांक एमएच २० ए १९५२ या नंबरचा रिकामा ट्रक तपासणीसाठी थांबवला.चालकाकडे वाहनाचे कागदपत्र नव्हते. तसेच वाहन चालवण्याचा परवानाही नव्हता. त्याने मालकाचे नाव लक्ष्मण शिवाजी चौधरी (रा.भातकुडगाव, ता. शेवगाव) असे सांगितले.
तसेच ई- चलान मशीनवर वाहनाचा नोंदणी क्रमांक तपासला असता मूळ मालकाचे नाव लक्ष्मण शिवाजी चौधरी राहणार भातकुडगाव तालुका शेवगाव असे दिसून आले. वाहन चालकाकडे वाहनाचे कागदपत्र नसल्याने त्याचे वाहनाचा चेसिस नंबर तपासला असता तो बनावट होता. नंतर मूळ वाहनाचा शोध घेतला असता ते शेवगाव तालुक्यात मिळाले. दोन्ही वाहने ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. फौजदार समाधान भाटेवाल हे अधिक तपास करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.