आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्न-औषध प्रशासनाकडे तक्रार:कॅडबरी खाल्ल्याने दोन बालकांना विषबाधा

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या मध्यवर्ती परिसरातील एका डेअरी व बेकरी दुकानदाराने कालबाह्य झालेल्या व खाण्या योग्य नसलेल्या कॅडबरीची विक्री केली. त्या कॅडबरी खाल्ल्यामुळे दोन लहान मुलांना फूड पॉयझनिंग झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात भूषण भिंगारादिवे यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली आहे.तक्रारदार भिंगारदिवे यांच्या बहिणीने १८ डिसेंबर रोजी एका दुकानातून कॅडबरीचे बॉक्स घेतले.

त्यातील कॅडबरी खाल्ल्यानंतर त्यांचा दीड वर्षाचा मुलगा व चार वर्षाच्या मुलीला उलट्या सुरू झाल्याने त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी हा त्रास फूड पॉयझनिंग मुळे झाल्याचे सांगितले.

त्यानंतर भिंगारदिवे यांनी कॅडबरीचे बॉक्स तपासले असता त्या ३० नोव्हेंबर रोजी कालबाह्य (एक्सपायर्ड) झाल्याचे समोर आले. सदर कालबाह्य कॅडबरी खाल्ल्यानेच दोन्ही मुलांना फूड पॉयझनिंग झाल्याचा दावा भिंगारदिवे यांनी केला आहे. या प्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन सदर दुकानदारावर कारवाई करावी, अशी मागणी भिंगारदिवे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...