आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमृतसागर दूध संघाची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र संचालक होण्यास इच्छुक असलेल्या बहुतांश उमेदवारांना मतदार यादीतील सर उमेदवारांच्या भेटी घेणे शक्य होत नाही. निवडणूक रिंगणातील स्वतः व इतर २९ उमेदवार वगळता उर्वरित १०० मतदारांच्या गाठीभेटी घेणे उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांनाही शक्य होईल, असेही चित्र दिसत नाही. सद्यस्थितीत मतदार यादीतील एकूण १३० मतदारांपैकी केवळ ५० ते ६० मतदारच तालुक्यात आढळून येत नाहीत, अशी अनेकांची खंत आहे.
एवढ्या मोठ्या संख्येत मतदार अचानक कोठे गडप झाले, कामानिमित्त तालुक्याबाहेर पडले की काय असे वाटत असल्याने गावोगाव जाऊन मतदारांपर्यंत संपर्क साधण्यात बहुतांश उमेदवारांना अपयश येत आहे. मतदार संपर्क साधण्यात त्यांची मोठी तारांबळ होत आहे. अमृतसागर सहकारी दूध संघाचे दैनंदिन दूध संकलन जवळपास ८० हजार लिटर आहे. यातील ६० हजार लिटर दूध हे १४० संलग्न सहकारी दूध उत्पादक संस्थांतून संकलन होते. तर साधारणतः २० हजार लिटर दूध खाजगी दूध संकलन केंद्रातून संकलन होते. अमृतसागर दूध संघ “अगस्ति” या नावाने तूप, दूध, ताक, दही, पनीर, पेढा, श्रीखंड असे काही उपपदार्थ निर्माण करून विक्री करतो. यातून वार्षिक ८ ते १० कोटींवर व्यापार होतो. तर सुमारे ९० ते ९२ कोटींची उलाढाल ही दैनंदिन संकलित दूध बाजारात विक्रीस उपलब्ध करून होते. यासाठी तालुक्यातील दुधाळ पशुधनावर योग्य देखभाल व आवश्यकतेनुसार उपचार करावे लागतात. तालुक्यातील २० हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील स्त्री पुरुष पहाटेपासून ते रात्रीपर्यंत सतत राबतात.
संघाच्या १० संस्थांतून मतदान प्रतिनिधीचा ठरावच वेळेवर प्राप्त झाले नाहीत. म्हणून यापैकी फक्त १३० दूध उत्पादक संस्थांचे ठरावाने अधिकार दिलेले मतदार प्रतिनिधी मतदानास पात्र आहेत. यापैकी १५ जागांवर दोन्ही पॅनलकडून ३० जण निवडणूकीत उमेदवार आहेत. उर्वरित १०० जण तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना ५ वर्ष पारदर्शक कारभार करण्यास प्राधान्य देऊन समाधान मिळवून देऊ शकतात, त्यांची संचालक म्हणून निवड करणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.