आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकस्मिक मृत्यूची नोंद:धावत्या रेल्वेतून पडून‎ पुण्यातील दोघांचा मृत्यू‎

श्रीगोंदे‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धावत्या रेल्वेतून पडल्याने दोन‎ तरुणांचा मृत्यू झाला. नागवडे‎ कारखाना रेल्वे फाटकाजवळ‎ रविवारी (ता. १२) रात्री ही घटना‎ घडली. अर्जुनसिंग सरबतसिंग टाक‎ (वय २९, रा. हडपसर, जि. पुणे) व‎ दिनेश विजय पवार (वय २८, रा.‎ गंजपेठ, जि. पुणे) अशी मृतांची‎ नावे आहेत.‎ पोलिसांनी दिलेल्या‎ माहितीनुसार, गेटमन बाळासाहेब‎ छगन कांडेकर (वय ३८) हे‎ रविवारी रात्री कारखाना फाटकावर‎ कर्तव्य बजावत असताना, रात्री‎ पावणे अकराच्या सुमारास त्यांना‎ रेल्वेमार्गावर मधोमध दोन तरुण‎ पडल्याचे दिसले.

रेल्वे गेल्यावर‎ त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता,‎ दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला होता.‎ याबाबत कांडेकर यांनी रेल्वेस्थानक‎ प्रमुखांना माहिती दिली. पोलिसांनी‎ घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात‎ घेतले. एकाच्या खिशात मोबाईल‎ असल्याने त्याच्या कुटुंबीयांशी‎ संपर्क साधण्यात आला. उत्तरिय‎ तपासणीनंतर दोन्ही मृतदेह त्यांच्या‎ नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात‎ आले. याप्रकरणी श्रीगोंदे पोलिस‎ ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद‎ करण्यात आली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...