आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:धक्का लागल्यावरून दोन कुटुंबांत हाणामारी; कोतवालीत गुन्हा दाखल

नगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धक्का लागल्यावरून दोन कुटुंबीयांमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना शनिवारी ईदगाह मैदानाजवळ घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत.

फिरोजखान अहमदखान (वय ५०, रा. इदगाह मैदान, किंग्ज गेट, नगर) हे जखमी असून त्यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे घराशेजारी राहणारे मजिद मेहबुब खान यांच्याबरोबर जागेवरून जुना वाद आहे. त्याचा दावा कोर्टाल चालू आहे. ४ जून रोजी सायंकाळी त्यांचा मुलगा रेहान याने फोन करून आयान यास इदगाह मैदान गेटजवळ फैसल साजिद खान, अरफात मजिद खान हे त्यांचा लहान भाऊ उसर यास धक्का लागल्याच्या कारणावरून मारहाण करत असल्याचे सांगितले. त्यांनी जाऊन भांडण मिटवले. त्यानंतर अरबाज अस्लम खान, अरफात मजिद खान, शोएब रशिद खान, शोजेब रशिद खान, फैसल साजिद खान, अरशान साजिद खान, रशिद ताहेर खान, अस्लम ताहेर खान (सर्व रा. किंग्ज गेट, नगर) यांनी फिरोजखान यांना त्यांच्या घरी जाऊन शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करून दमदाटी केली. त्यांची पत्नी शाबीरा फिरोज खान या भांडण सोडवण्यास मध्ये आल्या असता त्यांनाही मारहाण केल्याचे तसेच मारहाणीत पत्नीच्या गळ्यातील एक तोळ्याचे गंठण, मोबाईल गहाळ झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोना इमानदार करत आहेत.

दुसरी फिर्याद मजिद मेहबूब खान यांनी दिली आहे. ४ जून रोजी दुपारी ते दुकानात काम करत असताना भावाचा मुलगा उमर साजिद खान हा रडत आला व रिहान फिरोज खान याने मारल्याचे त्याने सांगितले. मजिद हे जाब विचारण्यासाठी गेले असता रिहान याने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच त्यांना सोडविण्यासाठी रशिद खान व फैसल खान हे गेले असता आयान खान याने त्यांनाही मारहाण केली. आलमास फिरोज खान व फिरोज खान तसेच इतर १०-१२ जणांनी मारहाण करून शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...