आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:अतिक्रमण केल्याने दोन ग्रामपंचायत सदस्य झाले अपात्र

श्रीरामपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मुठेवाडगाव ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांना सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण भोवले आहे. या सदस्यांना अपात्र ठरविण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला निकाल विभागीय उपायुक्तांनी कायम केला. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य गोरख सजन जाधव व उज्ज्वला आदिनाथ दिघे अपात्र ठरले आहेत. ग्रामपंचायतीची १५ जानेवारी २०२१ रोजी निवडणूक झाली होती. सत्ताधारी गटाने लंकाबाई दिनकर मुठे यांच्याविरुद्ध विश्वनाथ नानासाहेब मुठे यांनी ग्रामपंचायतीची थकबाकी असल्याच्या कारणास्ताव अपात्र करण्यासाठी तक्रार दाखल केली होती.

त्यावर विरोधी गटाकडून सुरेश दिनकर रूपटक्के यांनी गोरख सजन जाधव यांच्याविरुद्ध, तर शिवाजी लक्ष्मण मुठे यांनी उज्वला आदिनाथ दिघे यांनी अनुक्रमे गायरान व ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केले. अशा दोन तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला. अहवालात दोन्ही सदस्य गायरान व ग्रामपंचायतीच्या जागेत अतिक्रमण करून राहत असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला होता. ग्रामसेवक यांनी लंका मुठे यांच्याकडे ग्रामपंचायतची बाकी नसल्याचा अहवाल दिला होता.

बातम्या आणखी आहेत...