आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:चारचाकीच्या धडकेत दोघी जखमी

नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर क्लबच्या पार्किंगमध्ये एकाने भरधाव वेगात वाहन चालवून मायलेकींना धडक दिली. यात दोघीही जखमी झाल्या आहेत. धडकेत त्यांच्या गाडीसह इतर गाड्यांचेही नुकसान झाले आहे. ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

या प्रकरणी रीमा अभिमन्यू चौहाई (वय ४०, रा. गुलमोहर पोलिस चौकीजवळ, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. प्रवीण अजित घैसास (पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी रीमा व त्यांची मुलगी टीस्या अभिमन्यू चौहाई या धडकेत जखमी झाल्या आहेत. अधिक तपास पोहेकॉ जी. जी. गोरडे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...