आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:दोन नेत्यांनी खासगी सावकारांचे कर्ज फेडण्यासाठी सभासदांच्या दोन कोटी रुपयांवर मारला डल्ला; आण्णासाहेब शेलार यांचा विरोधकांवर आरोप

श्रीगोंदे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेलवंडी येथील भैरवनाथ सहकारी सोसायटीच्या खावटी कर्ज वाटपात दोन नेत्यांनी आपल्या खासगी सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी सर्वसामान्य सभासदाच्या नावावर दोन कोटींचे कर्ज काढून बळीचा बकरा केला. ही संस्था विरोधकांच्या हातात गेल्यास सहकारी ऐवजी खाजगी सावकारशाही संस्था झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांनी भैरवनाथ सहकार विकास पॅनल च्या उमेदवारांच्या प्रचार सभेत विरोधकांवर तोफ डागली.

श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणूक प्रचाराचा शुभारंभ सत्ताधारी भैरवनाथ सहकार विकास पॅनल च्या वतीने आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शेलार यांच्या नेतृत्वाखाली सभासद शेतकऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांना नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दोन अपक्ष उमेदवारांनी शेलार यांच्या पॅनल ला पाठिंबा दिल्याने शेलार यांचे पारडे जड झाले आहे.

शेलार म्हणाले, भैरवनाथ सेवा संस्थेचे, मशिनरी विभाग,खत विभाग, धान्य विभाग, औषधे व बी-बियाणे विभाग सुरू असून संस्थेचा कारभार ह पारदर्शक पणे चालू असून प्रत्येक सभासदाला येथे मान सन्मान दिला जातो. कोणत्याही सभासदाची कर्जासाठी येथे अडवणूक केली जात नाही. सभासदांच्या विश्वासावरच भैरवनाथ सोसायटी पुढे वाटचाल करत राहील. आजपर्यंत सोसायटीचा चांगला कारभार आणि पुढील विकासासाठी सभासद पुन्हा एकदा ही सोसायटी भैरवनाथ सहकार विकास पॅनल च्या हाती देऊन १३-० करतील, असा विश्वास अण्णासाहेब शेलार यांनी व्यक्त केला आहे.

याप्रसंगी किरण इथापे, शिवाजी शेलार, एकनाथ पवार,शंकर लाढाणे,अरुण डाके,सुनील ढवळे, नारायण चोभे, तात्याबा हिरवे, भगवान घोडेकर, विश्वनाथ दातीर, युवराज पवार, एकनाथ बोरुडे, ज्ञानदेव काळाने, अंकुश लबडे आदींसह उमेदवार व शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन सोपान हिरवे यांनी, प्रास्ताविक उपसरपंच उत्तम डाके यांनी, तर आभार स्वप्नील घोडेकर यांनी मानले.

मतदानास पात्र मतदार २९२९
संस्थेसाठी ११ जून रोजी मतदान होणार आहे. संस्थेचे एकूण सभासद ३७६५ इतके आहेत. मतदानास पात्र मतदार २९२९ आहेत. वर्षानुवर्षे या संस्थेवर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांची एकहाती सत्ता आहे. अण्णासाहेब शेलार यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ सहकार विकास पॅनल आणि ज्ञानदेव हिरवे यांच्या नेतृत्वाखाली किसान क्रांती पॅनलने १३ जागांसाठी आपले उमेदवार उभे केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...