आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:भीमा नदीपात्रात दोन यांत्रिक बोटी नष्ट

कर्जत2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत आणि दौंड महसुल पथकाने भीमानदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यावर संयुक्त कारवाई करीत नायगाव आणि वाटलुज (ता.दौंड) हद्दीतील दोन यांत्रिक बोटी आणि एक सक्शन या अनधिकृत बोटी नष्ट केल्या.खेड-गणेशवाडी (ता.कर्जत) येथील अवैध गौणखनिज उत्खनन प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कर्जत आणि दौंड महसुल पथकाने संयुक्त पथक तयार करीत भीमानदी पात्र गाठले.

त्यांना दौंड तालुक्यातील वाटलूज व नायगाव हद्दीत या पथकास दोन यांत्रिक आणि एक सक्शन बोट अनाधिकृत वाळू उपसा करताना आढळून आल्या. या अनाधिकृत बोटींना पथकाने नष्ट केले. या बोटीचे मालक अंकुश ठोंबरे (गणेशवाडी, ता.कर्जत) तसेच भरत शेंडगे (वाटलुज ता.दौंड) यांच्यावर अनधिकृत गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणी पर्यावरण कायदा व भारतीय दंड संहिता कलम ३५३ व ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही तहसीलदार दौंड यांच्याद्वारे सुरू आहे.

या पथकात कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे, दौंड तहसीलदार संजय पाटील, यांच्यासह निवासी नायब तहसीलदार अभिजित दिवटे, मंडळ अधिकारी नितीन मक्तेदार, सुनील जाधव तलाठी सचिन जगताप, संतोष इडोळे, खरात, विश्वास राठोड, धुळाजी केसकर, महसूल सहाय्यक अशोक नरोड आदी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...