आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 जुलै चोरी:पाणबुडी मोटार चोरणाऱ्या दोघा जणांना अटक

नगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या शेतामधून पाणबुडी मोटार चोरणार्‍या दोघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. राजू विठ्ठल धायमुक्ते व देविदास अर्जुन दुसंगे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पाणबुडी मोटारीसह २६ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. प्रतीक मायबा भिंगारदिवे यांच्या शेतामधील पाणबुडी मोटार व इतर साहित्य २८ जुलै चोरीला गेले होते.

या गुन्ह्याचा तपास पोलिस अंमलदार अजय नगरे हे करत आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार नगरे, राहुल द्वारके, साठे यांच्या पथकाने राजू धायमुक्ते याला कापूरवाडी येथून ताब्यात घेतले. त्यानंतर देविदास दुसुंगे याला अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबूली देत मुद्देमाल काढून दिला.

बातम्या आणखी आहेत...