आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:शेवगाव तालुक्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी

शेवगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव तालुक्यातील सुकळी येथील शेतामधून बैल घरी घेऊन जात असताना अचानक आलेल्या वन्यप्राण्याने भारत भवार (वय ५५) व शेतात जनावरांच्या गोठ्यात काम करत असणाऱ्या भागवत गरड (वय ४३) हे पिसाळलेल्या लांडग्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. दोघांच्याही हाताला व पायाला चावा घेतला.कुठल्या प्राण्याने हल्ला केला हे समजू शकले नाही. मात्र शेजारील गेवराई तालुक्यातील महारटाकळी येथे अशाच प्रकारे चार व्यक्तीवर हल्ले झाले. यात तो लांडगा असल्याचे निष्पन्न झाले. गरड व भवर यांना बोधेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले त्यांना तेथून प्राथमिक उपचार करून त्यांना नगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. वन विभागाला पाचारण केले असता त्यांच्या पायाच्या ठशावरून तो प्राणी लांडगा आहे हे सिद्ध झाले. तरी परिसरातील नागरिकांनी घाबरून जाता सतर्क रहावे, असे आवाहन सरपंच लहू भवार यांनी केले.

घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. रात्रीपासून येथे प्रत्यक्ष हजर राहून येथे माहिती घेतली असता गावातील ज्येष्ठ नागरिकांकडून सांगण्यात आले. हा लांडगा पिसाळलेला होता. त्याने बीड जिल्ह्यात चार व्यक्तींनी व शेवगाव तालुक्यात दोन व्यक्तींना चावा घेतला असुन. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहवे, असे आवाहन वनशेत्र अधिकारी अरुण साबळे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...