आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:शिर्डीतील सामूहिक अत्याचार प्रकरणात दोघे संशयित अटकेत

नगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनाथालयातील तरूणीवर शिर्डी येथील हॉटेलवर कामाला असलेल्या तरूणांनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. एमआयडीसी पोलिसांनी दोन तरूणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. शहरातील एका अनाथालयातून निघून गेलेल्या तरुणीवर शिर्डी येथे पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक पाठक यांनी मूळ जळगाव जिल्ह्यातील व सध्या शिर्डीत वास्तव्यास असलेल्या दोन तरूणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांनी घटनेची कबूली दिली असून त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडे चौकशीसाठी न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे निरीक्षक आठरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...