आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:नगर शहरात धुमाकूळ घालणारी‎ सहा दुचाकी चोरांची टोळी जेरबंद‎, 24 दुचाकींसह 23 लाखांचा मुद्देमाल जप्त

नगर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ नगर शहरात विशेषतः तोफखाना पोलिस ‎ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद ‎करण्यात पोलिसांना यश आले आहे.‎ सहा जणांच्या टोळीकडून २३.४०‎ लाखांच्या २४ दुचाकी हस्तगत करण्यात ‎आल्या.‎ शहरात गेल्या काही महिन्यांपासून‎ दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत.‎ या दुचाकी चोरांच्या टोळीला‎ पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू‎ होते.

तोफखाना पोलिस ठाण्याचे‎ निरीक्षक मधुकर साळवे यांना गुप्त‎ बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या‎ आधारे, गुन्हे शोध पथकातील‎ अंमलदारांनी मार्केटयार्ड परिसरामध्ये‎ सापळा रचला. संशयित हालचाली‎ असलेल्या एका इसमाला पथकाने‎ पाठलाग करून पकडले. मनोज गोरख‎ मांजरे असे त्याचे नाव आहे. त्याने‎ चौकशीत त्याच्या साथीदारासह दुचाकी‎ चोरल्याची कबुली दिली.

नगर पोलिसांची कारवाई

मिळालेल्या‎ माहितीनुसार पोलिसांनी करण मनोज‎ पवार, साहिल गफूर पठाण, योगेश‎ सावळेराम मांजरे, उमेश दिलीप‎ गायकवाड, शुभम अविनाश महांडुळे‎ यांना ताब्यात घेतले.‎ या पथकाने केली कारवाई‎ उपविभागीय पोलिस अधिकारी‎ अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली‎ तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली.

24 गाड्या जप्त

दुचाकीचोरांकडून २४‎ गाड्या केल्या जप्त‎ पोलिसांनी दुचाकी चोरांकडून ३ बुलेट,‎ ८ एचएफ डीलक्स, ३ स्प्लेंडर, २ पॅशन‎ प्रो, २ पल्सर, १ ऍक्सेस, १ शाईन, अशा‎ एकूण २४ विविध कंपन्यांच्या २३ लाख‎ ४० हजार रुपये किमतीच्या दुचाकी जप्त‎ केल्या आहेत. याप्रकरणी सहा जणांना‎ पोलिसांनी अटक केली असून, पुढील‎ तपास सुरू आहे.‎ जप्त केलेल्या दुचाक्यांसह पोलिस अधीक्षक राकेश ओला, उपअधीक्षक अनिल‎ कातकाडे व तोफखाना पोलिसांचे पथक.‎