आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायी चोरी:गायी चोरून नेण्याचा प्रयत्न करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

राहुरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुळानगर परिसरात चरायला सोडलेल्या कळपातील गायी चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा जणांना स्थानिक गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडून लाथाबुक्क्याने तुडवत पोलिसांच्या ताब्यात दिले. ३१ डिसेंबरला दुपारच्या वेळेत कळपातील गायी चोरून नेण्याचा प्रयत्न झाल्याची ही घटना घडली. या घटनेची खबर मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले.

या टोळीत आणखी तिघांचा समावेश असुन फैयाज शेख हा जनावरे खरेदी करणारा व्यापारी असल्याची माहिती पोलिसांना दिली. या टोळीतील चौघांच्या तपासासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. यापुर्वी मुळानगर तसेच राहुरी परिसरातुन जनावरे चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र या भागात नियुक्त असलेल्या पोलिसांना अद्याप तपास लागलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...